जळगाव (प्रतिनिधी) येथील आसोदा रोडवरील गायत्री नगरात राहणारा शुभम संजय पाटील हा २१ वर्षीय तरूण बेपत्ता झाला आहे. आईच्या खबरीवरून मंगळवारी सकाळी शनिपेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आसोदा रोडवरील गायत्री नगरात राहणारा शुभम पाटील (वय-२१) हा आपल्या आईवडीलांसह राहातो. गुरूवारी १३ मे रोजी सकाळी ६ वाजता मी वेटरचे काम करून येतो असे आई प्रमिला पाटील यांना सांगून शुभम घराबाहेर पडला. सायंकाळी उशीरापर्यंत घरी आला नाही म्हणून आईवडील चिंतेत पडले. त्यांनी मित्र, नातेवाईकांशी संपर्क साधून मुलगा शुभम आला की नाही याची चौकशी केली. दोन दिवसांनंतर अखेर आज मंगळवारी सकाळी शनिपेठ पोलीस ठाण्यात आई प्रमिलाबाई यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक अमोल विसपूते करीत आहे.