यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात ग्रामपंचायतमध्ये पाण्याची समस्या घेऊन गेलेल्या ३० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. ३ मे २०२२ रोजी १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास पीडित महीला ग्रामपंचायतमध्ये पाण्याची समस्या घेवून गेली होती. यावेळी ग्रामपचायतमध्ये हजर असलेले नितीन व्यंकट चौधरी, देविदास हिरामण कोळी, शिपाई धनराज मुरलीधर चौधरी, लिपिक मोहन भिमराव बाविस्कर, विशाल सुधा तायडे, सुभाष बाबुराव तायडे, विजय चंद्रकांत चौधरी, संदेश यशवंत पाटील यांनी पाण्याची समस्या ऐकुन न घेता महीलेची छेडछानी करुन लज्जा उप्तन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोउनि विनोद खांडबहाले हे करीत आहेत.