धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव ते चावलखेडा स्टेशन दरम्यान एका ३६ वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ०९:०० च्या सुमारास धरणगाव ते चावलखेडा स्टेशन दरम्यान एका ३६ वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत चावलखेडा स्टेशन मास्टर यांनी मेमोद्वारे धरणगाव पोलीस स्टेशनला याची माहिती कळविली. माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्टेशनचे पोउनि गवारे, पोहेको संतोष थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मयताची तपासणी केली असता त्याच्या खिशात सुभाषभाई दुराभाई गऊड (वय ३६ रा. ७१/३ पटेल नगर उधना, सुरत गुजरात) या नावाचे मतदान कार्ड मिळाले आहे. याची चौकशी केली परंतु नातेवाईकांचा शोध लागला नाही. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास खुशाल पाटील करीत आहे.