धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी मनीष गायकवाड यांच्या आदेशाने ४४ जणांना धरणगाव तालुक्यातून चार दिवसासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व धरणगावचे पो.नि. उद्धव ढमाले यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, ज्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्या कारणाने शांततेचा भंग होऊ शकतो, अशा ४४ जणांना प्रांताधिकारी मनीष गायकवाड यांनी दिलेल्या आदेशानुसार हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, वेळ कमी असल्यामुळे २५ ते २९ मार्चच्या रात्री ८ वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातून या ४४ जणांना हद्दपार करण्यात येत आहे. यानंतर ही या तालुक्यात दिसल्यास आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. या ४४ जणांमध्ये पाळधीचे ३५, बांभोरीचे ३ तर उर्वरित ६ जण जळगाव येथील असल्याची माहिती पाळधीचे स.पो.नि. सचिन शिरसाठ यांनी दिली.