जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्यांविरुध्द मुं.पो. का. क. ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून चौकशी करून त्यांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
भावना जवाहरलाल लोढा (वय ३८ रा. अयोध्यानगर, जळगाव टोळी प्रमुख), अनिल रमेश चौधरी (वय ४०, टोळी सदस्य, रा. अयोध्यानगर, जळगाव), सैय्यद सर्जील सैय्यद हारुन (वय २६ टोळी सदस्य रा. मास्टर कॉलनी, मेहरुण, जळगाव), सैय्यद आमीन सैय्यद फारुख पटवे ऊर्फ बुलेट (वय २६ रा. मास्टर कॉलनी, मेहरुण, जळगाव), सैय्यद अराफत सैय्यद फारुख (वय ३४ रा. तांबापुरा, जळगाव जि.जळगाव) यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्थानक, जामनेर पोलीस स्थानक, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानक, पहुर पोलीस स्थानक, चाळीसगाव शहर पोलीस स्थानक, नशिराबाद पोलीस स्थानक व चाळीसगाव रेल्वे पोलीस स्थानकात एकूण ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग यांनी केला होता.
या टोळीने जळगाव जिल्हयांत ठिक ठिकाणी दहशत पसरविण्याचा आरोप आहे. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. त्यांना जळगाव जिल्ह्यात शांतता ठेवण्याबाबत त्यांच्याविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल असून त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे, असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. सदरचा हद्दपार प्रस्ताव हा एमआयडीसी पो.स्टे.चे पो. निरीक्षक जयपाल हिरे, सफौ/ अतुल वंजारी, पोना/सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, निलोफर सैय्यद, चापोना/इम्तियाज खान यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता.
जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी प्रस्तावाची चौकशीअंती सर्व गुन्हेगारांना एक वर्षाकरीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांनी व त्यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ/सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले.