जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नेरी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचे उपसहात्मकपर अभिनंदन करणारे ५०० पत्र पंतप्रधान मोदी यांना पाठवून केंद्र सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. यावेळी मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नेते अशोक कोळी, राजू पाटील, सरपंच दिनू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष किशोर आप्पा खोडपे, सोशल मीडिया प्रमुख निलेश बोदडे, उपाध्यक्ष आशिष दामोदर, नेरी युवा गट प्रमुख रुपेश पाटील, नेरी गण प्रमुख शुभम मोगरे, नेरी शहराध्यक्ष पवन वाघ, विद्यार्थी प्रमुख विवेक कुमावत, जळगाव शहर सरचिटणीस गणेश पाटील, स्वप्नील पाटील, हृषीकेश पाटील, शुभम खोडपे, यश सोनार, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.