अमळनेर (प्रतिनिधी) लसींच्या पुरवठ्याचे अल्प प्रमाण असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणासाठी लसी उपलब्ध होण्याची मागणी लोकनियुक्त नगराध्यक्ष जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील यांनी केली आहे. या मागणीनुसार ६ ऑक्टोबर रोजी ५ हजार लसी अमळनेर शहरासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झाल्या आहेत.
अमळनेर नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांसाठी ५ ऑक्टोबर पर्यंत कोविड-१९ लसीकरणाचे एकूण डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या ५२ हजार ८१५ एवढी आहे. तर पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या ३७ हजार ९९५ असून दुसरा डोस घेतले. लाभार्थ्यांची संख्या १५७२० एवढी आहे.
लसींच्या पुरवठ्याचे अल्प प्रमाण असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणासाठी लसी उपलब्ध होण्याची मागणी लोकनियुक्त नगराध्यक्ष जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील यांनी केली. या मागणीनुसार ६ ऑक्टोबर रोजी ५००० लसी अमळनेर शहरासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या असून सदर लसीकरण नियोजित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व नगर परिषद दवाखाना यांचेमार्फत प्रभागनिहाय टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत.
नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता पुष्पलता साहेबराव पाटील यांनी नागरिकांना केले आहे. सदर लसींची मागणी लोकनियुक्त नगराध्यक्षा यांनी प्रशासनाकडे केली होती.