जळगाव (प्रतिनिधी) आज जिल्ह्यात 596 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जळगाव शहरासह पारोळा, चोपडा, अमळनेर आणि भुसावळ तालुक्यात वाढला आहे. दरम्यान, आज 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजच 605 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तालुका निहाय आजची आकडेवारी
जळगाव शहर – 100; जळगाव ग्रामीण – 32; भुसावळ-88; अमळनेर-60; चोपडा-55; पाचोरा-20; भडगाव-२6; धरणगाव-27; यावल-39; एरंडोल-24, जामनेर-42; रावेर-28; पारोळा-36; चाळीसगाव-29; मुक्ताईनगर 24, बोदवड-09 व दुसर्या जिल्ह्यांमधील 10 असे एकुण 596 रूग्ण आढळून आले आहेत.
शहर निहाय एकूण आकडेवारी
जळगाव शहर-९८१४, जळगाव ग्रामीण-२२३८; भुसावळ-२६८९; अमळनेर-३८३६, चोपडा-३६८६; पाचोरा-१७०७; भडगाव-१६९८; धरणगाव-१९५१; यावल-१४४८; एरंडोल-२६२३, जामनेर-३०९९; रावेर-१८०८; पारोळा-२२३५; चाळीसगाव-२८४४; मुक्ताईनगर-११८०, बोदवड-७०८ व दुसर्या जिल्ह्यांमधील ३३४ असे एकुण ४३,८९७ रूग्ण आढळून आले आहेत. तर आजच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या ४३ हजार ८९७ इतकी झालेली आहे. यातील ३२, ९४१ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ६०५ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १६ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १०९६ इतका झालेला आहे.