पाळधी ता. धरणगाव (शहाबाज देशपांडे) गावातील हाजी उस्मान नगरातून अज्ञात चोरट्यांनी ६९ हजाराच्या बकऱ्या चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, शेख सलीम शेख मुसा (वय २६) हे गावातील हाजी उस्मान नगरात वास्तव्यास आहे. दि. ११ मार्च २०२२ रोजी रात्री १० ते दि. १२ मार्च २०२२ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या बाजूच्या पत्री शेडमधून ६९ हजार रुपये किंमतीच्या बकऱ्या चोरून नेल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे. कॉ. अरुण निकुंभ हे करीत आहेत.