भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ उपविभागातील सर्व पोलीस स्थानकाच्या हद्दीत दिनांक ५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते पहाटेचे ४ वाजेपर्यंत ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, पाहिजे असणारे आरोपी अटक करणे, न्यायालयाने अटक वॉरंट काढलेल्या व्यक्तींना अटक करणे तसेच तडीपार गुन्हेगार चेक करणे, हिस्ट्री शीटर चेक करणे, शहरांमध्ये संशयितरित्या फिरताना मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करणे आदी विविध प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या.
या मोहिमेत एकूण ३४ अटक वॉरंटची बजावणी करण्यात आली. विविध न्यायालयाने ज्यांचे विरुद्धा अटक वॉरंट काढले त्यांची बजावणी केली. त्यापैकी काहींना अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे . याशिवाय एकूण 11 जामीनपात्र वॉरंट बजावणी करण्यात आली तर 63 समंस बजावणी करण्यात आलेली आहे. शहरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या दोन जणांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
शहरामध्ये दारू पिऊन फिरणाऱ्या दोन व्यक्तींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 84 खाली दोन गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्या दोन दुकानदारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 खाली कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली दोन ठिकाणी रेड करण्यात आलेले असून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. रेकॉर्डवरील पाहिजे असणारे आरोपी देखील चेक करण्यात आले या शिवाय शहरातील एकूण 32 हिस्ट्री शीटर या मोहिमेदरम्यान चेक करण्यात आलेले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या निर्देशानुसार सदरची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक गायकवाड बाजारपेठ पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे नशिराबाद पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक दूनगहू भुसावळ शहर, सहाय्यक पोलीस पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ, साहाय्यक पोलीस निरीक्षक भोये, psi महाजन, psi पाथरवट तसेच सर्व पोलीस स्टेशन कडील अंमलदार व एक RCP पथक सामील होते.