नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. देशातील राज्यांनी सुरक्षेच्या पातळीवर काही ठिकाणी अंशतः तर काही ठिकाणी पूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासात तब्बल ९६ हजार ९८२ नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
सोमवारी, कोरोना संक्रमणकाळातील आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली होती. या दिवशी २४ तासांत १ लाख ०३ हजार ५५८ कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशात आतापर्यंत ८ कोटी ३१ लाख १० हजार ९२६ नागरिकांना लस देण्यात आलीय. यातील ४३ लाख ९६६ नागरिकांचं लसीकरण काल (सोमवारी) पार पडलं.
एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी २६ लाख ८६ हजार ०४९
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी १७ लाख ३२ हजार २७९
उपचार सुरू : ७ लाख ८८ हजार २२३
एकूण मृत्यू : १ लाख ६५ हजार ५४७
लसीकरण करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या : ८ कोटी ३१ लाख १० हजार ९२६