मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाऊनमुळे आर्थिक तुटीचा सामना करणाऱ्या महावितरणच्या तब्बल ९८ लाख ग्राहकांनी गेल्या सात महिन्यांत वीज बिलापोटी एक दमडीही भरली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महावितरणच्या एकूण थकबाकीचा आकडा ४७ हजार कोटींवर पोहचला आहे.
राज्यभरात महावितरणाचे अडीच कोटी वीज ग्राहक आहेत. सर्वाधिक १ कोटी ८३ लाख घरगुती ग्राहक असून कृषी पंपधारकांची संख्या ५० लाखांच्या घरात आहे. आतापर्यंत केवळ कृषी पंपाचे मोठ्या प्रमाणात वीज बिल थकीत होते. मात्र लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे अन्य ग्राहकांनीही वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवली आहे.
त्यामुळे एप्रिलपासून एकदाही वीज बिल न भरणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांची संख्या ५५ लाख ९८ हजार झाली असून त्यांच्याकडे ३५३८ कोटी रुपये थकीत आहे. तसेच त्यानंतर वाणिज्यिक ग्राहकांकडून थकीत बाकी आहे. ५ लाख ९२ हजार ग्राहकांकडून ८३६ कोटी रुपयांची थकीत बाकी आहे.














