धरणगाव (प्रतिनिधी) खासदार स्मिताताई वाघ यांचा धरणगाव महायुतीतर्फे नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष उपस्थिती होती. शहरातील वाणी मंगल कार्यालय नवनिर्वाचित हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर जळगाव ग्रामीणमध्ये 63 हजाराच्या लीड मिळाला आणि आता महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या जोरावर महायुतीचे सरकार पुन्हा निवडून येईल. स्मिताताई वाघ यांनी केंद्रात निम्नतापी प्रस्तावचा पाठपुरावा करावा. जेणेकरून जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होईल. स्मिताताई वाघ यांनी सत्काराला उत्तर देतांना माझ्यासाठी माझे भाऊ गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीच्या ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महिलांनी सहकार्य केले, मला निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, त्यांच्या मी ऋणात असल्याचे सांगितले. मी तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. या 5 वर्षाच्या कार्यकाळात जास्त जास्ती विकास कामे करण्याचा प्रयत्न करेल.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना जळगाव जिल्ह्याचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी सांगितले की, स्मिताताई वाघ यांना जळगाव ग्रामीणमधून 63 हजाराच्या लीड मिळाला आहे. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांना 1 लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येतील.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून स्मिताताई वाघ, भाजपचे जेष्ठ नेते डी.जी. पाटील, सुभाषअण्णा पाटील, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, शिवसेनेचा महिला प्रमुख सरिताताई कोल्हे, प्रमिलाताई रोकडे हे उपस्थित होते. याप्रसंगी सुभाष पाटील, नगरसेवक अभिजीत पाटील यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संजय महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीपभाऊ महाजन यांनी मानले. कार्यक्रमाला शिवसेना-भाजप राष्ट्रवादी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.