धरणगाव (प्रतिनिधी) सालाबादा प्रमाणे श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळामार्फत झालेल्या वाहनास जोडी जुंपन्याचा लिलाव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यात मारोतीचे वाहनाचा लिलावाच्या वेळी रेकॉर्ड ब्रेक बोली लागली. एरंडोल येथील ॲड. ओम त्रिवेदी यांनी वहनासाठी ४ लाख २१ हजार रुपयांची बोली लावली.
लिलावात मारोतीचा वाहनास जोडी जुंपन्यासाठी सुरुवाती पासुनच चढाओढ झाली. असंख्य भाविकांकडून बोली लावत हे वाहन एरंडोल येथील ॲड ओम त्रिवेदी यांनी ४ लाख २१ हजार रुपयात घेतल्याने आतापर्यंतच्या बोलीमध्ये सर्वात जास्त किंमत मिळाली आहे.
या प्रसंगी हजारो भाविक भक्तांनी श्री बालाजी महाराजाचा जयघोष केला. गेल्या दिडशे वर्षापासून येथील बालाजी वहन व रथ उत्सव मोठ्या श्रध्देने व भावनेने सुरु असून ह्या वर्षी दि. १५ ऑक्टोबर २३ घटस्थापने पासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी दि ६ ऑक्टोबर २३ रोजी जाहीर जोडी लिलावाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्या प्रसंगी हजारोंच्या संख्येने शहर परीसरातील असंख्य भाविक उपस्थित होते.
प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष डि.आर पाटील यांनी आगामी काळात होणारे रथ व वहनोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले व उपस्थित भाविक भक्ताचा भावना जाणून घेतल्या.
उर्वरित वाहनाचा लिलाव खालील प्रमाणे आहेत !
ध्वजावहन (गजाननाचे) १०५०१
हत्तीचे वहन २१००१
सूर्याचे वहन १५००१
मोराचे वहन २०००१
शेषाचे वहन ४६००१
घोड्याचे वहन २२७०१
राजहंसाचे वहन २६००१
मारोतीचे वहन ४२११११
दुर्गादेवीचे वहन ३११११
चंद्राचे वहन १६१११
गरुडाचे वहन ७१११
अंगदाचे वहन ८१११
पांडवसभेचे वहन २५१११ या प्रमाणे आहे. लिलाव प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष डि.आर.पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ,कार्याध्यक्ष जिवनसिंह बयस, सेक्रेटरी प्रशांत वाणी, सह सेक्रेटरी अशोक येवले, खजिनदार किरण वाणी व लिलाव जाहीर करतांना मंडळाचे विश्वस्त मंडळ तसेच श्रीबालाजी व बजरंग बली चा जयघोष केला , लिलाव सभेला भाविकांची अभुतपुर्व व अलोट गर्दी होती, मंडळाचे सदस्य भानुदास विसावे, ॲड संजय महाजन, भास्कर मराठे व रवि काबरे यांनी लिलाव बोली कुशलतेने सांभाळली , धरणगाव पो.स्टे.पी. एस.आय समाधान पवार, पो.काॅ. विजय धनगर,वैभव बोरसे हे उपस्थित होते.