यावल (प्रतिनिधी) येथील यावल-फैजपुर रोडवरील पेट्रोल पंपा समोर दुचाकी व कारच्या भिषण अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. सैय्यद खलील सैय्यद हमीद (वय ४५, रा. डांगपुरा), असे मयताचे नाव आहे.
यावल फैजपुर मार्गावरील सुहानी पॅट्रोल पंपा समोरील परिसरात दि.३० नोव्हेंवर रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान सैय्यद खलील सैय्यद हमिद हे बुलेट मोटरसायकलने यावल कडे येत असतांना याच ठिकाणी रस्त्यावर असलेल्या स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएम०४ डी एन २६२७) या वाहनाने धडक दिली. या अपघातात सैय्यद खलील सैय्यद हमीद (वय ४५, रा. डांगपुरा, यावल) यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यास पुढील उपचारासाठी भुसावळ येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत मयताचा पुतण्या सैय्यद तन्वीर सैय्यद शकील यांच्या फिर्यादीवरुन दाखल करण्यात आला आहे.
















