TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ एसबीआय आनंद नगर शाखेत कोट्यावधीच्या कर्ज घोटाळ्याची तक्रार ; चौकशीला सुरुवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2020
in अर्थ, क्रीडा, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळातून व्यवसासाठी बोगस लाभार्थ्यांच्या नावे ७०२ प्रकरणात ६७ बँकांमधून तब्बल ६.५० कोटीचा अपहार केल्याचा गुन्हा २०१८ मध्ये जळगाव रामानंद पोलिसात दाखल असतांना आता स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आनंद नगर शाखेत करोडोचा गृह कर्ज घोटाळ्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत एसबीआयने चौकशीला सुरुवात केल्याचे वृत्त आहे.

 

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

यासंदर्भात एका तक्रारदाराने जून २०२० मध्ये तक्रार केली होती. परंतू पाच महिने होऊन देखील त्यावर कारवाई न झाल्यामुळे तक्रारदाराने २७ ऑक्टोबर रोजी स्टेट बँकेच्या रिजनल मॅनेजर यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. दरम्यान, जून २०२० मध्ये दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले होते की, भुसावळ येथील जामनेर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आनंद नगर शाखा प्रबंधक नंदलाल पाटील यांनी पदभार स्विकारल्यापासून भुसावळमधील कुख्यात गुंड प्रवृत्तीच्या हिस्ट्रीशिटर गुन्हेगार ज्यांनी महात्मा फुले महामंडळ जळगाव, पंजाब नॅशनल बँक शाखा भुसावळ, युनियन बँक शाखा भुसावळ, बँक ऑफ इंडिया शाखा भुसावळ येथे नकली आधारकार्ड, पॅनकार्ड, खऱ्या स्वरूपाचे वाटेल असे बनावट ३ वर्षाचे आय.टी. रिटर्न व बनावटी लाभार्थी तयार करून बँकांना व महामंडळामध्ये करोडा रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्याच लोकांनी शाखा प्रबंधक नंदलाल पाटील यांच्यासोबत संगनमत करून आपला हिस्सा ठरवून बनावट कर्ज प्रकरण पास करत आहेत. तसेच या कर्ज प्रकरणांमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार करीत आहेत. होमलोनची कर्ज मंजुरी करतांना बोगस लाभार्थी उभे करून फक्त कर्ज घेण्यासाठी अर्जट खाते खोलून बनावट पॅन कार्ड, तीन वर्षांचे आय.टी रिटर्न, बनावट कोटेशन तयार करून कर्ज घेतली आहेत. याप्रकरणातील सर्व बोगस लाभार्थ्यांची पत्त्यांची आणि व्यवसायाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

 

परंतू पाच महिने होऊन देखील तक्रारी अर्जावर कारवाई न झाल्यामुळे तक्रारदाराने रिजनल मॅनेजर यांना पुन्हा पत्र लिहिले व त्यात म्हटले की, मागील तीन-चार महिन्यापासून तक्रार करून देखील कारवाई होत नसल्यामुळे आपण पुढील ३० दिवसांच्या आत तक्रारी अर्जाचे उत्तर न दिल्यास व आमचे तक्रारीची दखल न घेतल्यास आपण सदर महाभ्रष्टाचारामध्ये समाविष्ट असल्याचे गृहित धरून आपले विरूध्द कोर्टात क्रिमीनल प्रोसेस कोर्ट कलम 156 [3], अनुसार भादंवि. कलम 477 [अ], 420, 119, 468, 469, 470, 471, 201 व 34 प्रमाणे वकिलामार्फत भुसावळ न्यायालयात न्याय मागू, असे म्हटले आहे.

 

एसबीआयकडून चौकशीला सुरुवात

तक्रारदाराचे दुसऱ्या अर्जात थेट बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप लावल्यामुळे एसबीआयकडून चौकशीला सुरुवात करण्यात आल्याचे वृत्त आहे. यात एका पगारे नामक मयत महिलेला साधारण १८/१९ लाखाचे कर्ज देण्यात आल्या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांनी संबंधित मयत महिलेच्या नातेवाईकांचे ऑन कॅमेरा जबाब घेल्याचे वृत्त आहे. तर याप्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत बँकेचे तपास अधिकारी श्री. सोनवणे यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी तक्रारी अर्ज पाप्त झाली आहे. परंतू बाहेरगावी कामात असल्यामुळे नंतर बोलतो, असे सांगीतले.

 

२०१८ मध्ये ६.५० कोटींचा अपहार

महात्माफुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत गरीब गरजूंना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य दिले जाते. महामंडळाने पाठवलेल्या लाभार्थींच्या प्रकरणांवर कर्ज मंजूर झाल्यास संबधीताच्या वैयक्तीक स्टेट बॅंकेतील खात्यात कर्जाची रक्‍कम वर्ग होऊन कर्जाचे खाते सुरू केले जाते व त्यातूनच फेड करायची असते. परंतू या प्रकरणात बनावट लाभार्थीसह सर्वच कागदपत्र बनावट सादर करून साधार ६७ बँकांमधून ७०२ वेगवेळ्या प्रकरणात प्रत्येकी ९० हजार असा ६.५० कोटीच्या सबसिडीचा अपहार केल्याप्रकरणी महात्माफुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे तत्कालीन जिल्हा व्यवस्थापकानी ४ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बोगस लाभार्थ्यांचे नावाने कर्ज मंजूर करण्यासह बँकेचे बनावट दस्तऐवज तयार करून सबसिडीची रक्कम वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकरणात काही व्यक्तीच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासाला आता आर्थिक गुन्हे शाखेकडून वेग आला असून याप्रकरणात आणखी काही आरोपी वाढणार आहेत.

 

गुन्ह्याची एकच मोडस ऑपरेंडी आणि एकच टोळी !

 

महात्माफुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत वेगवेगळ्या प्रकरणात सबसीडी लाटणारी टोळीने बनावट लाभार्थींचे बनावट दस्तऐवज तयार केले होते. एवढेच नव्हे तर, बँकेचे देखील कागदपत्र आणि बनावट शिक्के तयार केले होते. हीच पद्धत आताच्या बनावट गृह कर्ज प्रकरणात वापरण्यात आल्याचे समोर येत आहेत. तक्रारदाराने देखील आपल्या तक्रारी अर्जात तसे नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे २००८ मधील गुन्ह्याची आणि आताची मोडस ऑपरेंडी एकच दिसून येत आहे. विशेष म्हणजे टोळी देखील एकच असल्याचे बोलले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

शॉकींग : फ्लिपकार्ट पार्सल बॅगची चोरी; ४२ हजाराच्या वस्तू लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 नोव्हेंबर 2025 !

November 6, 2025

Today horoscope : जाणून घ्या.. आजचे सविस्तर राशिभविष्य 13 फेब्रुवारी 2025 !

February 13, 2025

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे कोरोना लसीकरण

October 30, 2021

मलाही अटक करा…’ते’ पोस्टर शेअर करत राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान !

May 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group