धरणगाव (प्रतिनिधी) येथील अहमदरजा चौक येथे काही लोकांनी विनापरवानगी एकत्र येऊन धार्मिक भावना दुखविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मोहम्मद यूसुफ अहलेकर याच्यासह नऊ जणांविरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी धरणगाव शहरातील अहमदरजा चौक येथे मोहम्मद यूसुफ अहलेकर मशिद अली, सादिक शेख खालील मोमीन, शेख मुस्ताक शेख नबी मोमीन, जुनेद अहमद कबीरुद्दीन मोमीन, अब्दुल सलीम गोस महम्द मोमीन, शेख शाकीर शेख सादीक मोमीन, मोहम्मद रिजवान मोहम्मद कबीर मोमीन, कमरोद्दीन कबीर मोमीन मशीद अली, दाऊद मोमीन मंडपवाला (इतर सर्व रा. अहमद रजा चौक, धरणगाव, ता.धरणगाव, जि जळगाव) यांनी विनापरवानगी डीजे वाजत मिरवणुक कशी आली असे सार्वजनिक बोलुन दाखविले. यावेळी मिरवणुकीस विरोध करून सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी तेथून निघून जाण्याचे सांगितले तरीही त्यांनी नकार दिला आणि “आम्ही अहमदरजा चौकातून मिरवणूक जावू देणार नाही” असे जाहीरपणे सांगितले. तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने पोकॉ सुमित गोपाळ बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सपोनि निलेश वाघ हे करीत आहेत.