मुंबई (वृत्तसंस्था) जळगावमधील आशादीप वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात येणार असून या समितीचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार आहे. त्यानंतर नियामानुसार दोषींवर कारवाई होईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितलं.
जळगाव स्थित गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी बराच गदारोळ माजल्यानंतर गृहमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली जाणार असल्याची व त्यांचा अहवाला आल्यानंतर कारवाईचे आश्वासन दिले आहे.