बोदवड (प्रतिनिधी) एका साडेसोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सय्यद वाजीद सय्यद रशीद (वय २५) याच्याविरुद्ध बोदवड पोलिसात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका साडेसोळा वर्षीय बलिकेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात दोन मुलांचा बाप असलेल्या सय्यदने अडकवले होते. दि २० रोजी सदर बालिका प्रात विधीला घरात लगत असलेल्या प्रसाधन गृहात बराच वेळ जाऊन सुद्धा ही मुलगी न आल्याने पालकांनी जाऊन पाहिले असता सदर संशयित आरोपी सय्यद हा त्या बलिकेसोबत अश्लील चाळे करत विनयभंग करत असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी त्याला अटकाव केला असता मारण्याची धमकी देत सय्यद त्या ठिकाणाहून पसार झाला. याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सय्यदविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराध पासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८(१२) कलम ३५४(अ)(१) (i), कलम ३५४(ड) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि.अंकुश जाधव हे करीत आहेत.