TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० हजारापेक्षा अधिक व्यक्तींकडून ६३ लाखाचा दंड वसूल

दंडात्मक कारवाईत पोलीस प्रशासन आघाडीवर

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कडक निर्बंध लागू केले असून नागरीकांसाठी नियमावलीही जाहिर केली आहे. तथापि, काही नागरीक नियमांचे पालन करीत नसल्याने पोलीस व नगरपालिका प्रशासनाने जिल्ह्यातील अशा २० हजार २६८ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करुन त्यांचेकडून ६३ लाख ६ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल केला आहे. शिवाय ५७४ व्यक्ती व संस्थावर गुन्हे दाखल करण्यात आले असून २३ प्रतिष्ठाने सील करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नियमावली ठरविली असून मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडी ठेवणे, गर्दी करणे, कोविडच्या उपाययोजना न करणे आदिंसह इतर कारणांसाठी दंडात्मक कारवाईचे निर्देश पोलीस, महानगरपालिका व नगरपालिका प्रशासनास दिल्या आहेत. असे असूनही काही नागरीक व आस्थापना कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याने त्यांचेवर दंडात्मक करावाई करण्यात येत आहे.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

जिल्ह्यात आतापर्यंत मास्क न लावणाऱ्या १९ हजार ७७ व्यक्तींकडून ५३ लाख ८३ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १५ व्यक्तींकडून ६९ हजार ८०० रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या ५६१ व्यक्तींकडून २ लाख १७ हजार ४०० रुपये दंड वसूल केला असून ५३१ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या २४१ प्रतिष्ठानांना यामध्ये मंगल कार्यालये, नाट्यगृह, हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह यांना ४ लाख ८० हजार ३०० रुपये दंड करुन ४३ प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहेत तर २३ प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या सार्वजनिक वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना १ लाख ५५ हजार २०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

दंडात्मक कारवाईत पोलीस प्रशासन आघाडीवर

जिल्ह्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यामध्ये पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलीस दल आघाडीवर आहेत. जिल्हा पोलीस दलाने मास्क न वापरणाऱ्या १२ हजार ६०३ व्यक्तींकडून २६ लाख ८१ हजार २०० रुपयांचा, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या ५३१ व्यक्तींकडून १ लाख ८१ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला असून ५३१ व्यक्तींवर गुन्हेही दाखल केले आहेत. तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणारे ३८ प्रतिष्ठानांकडून ६९ हजार दंड करुन ३८ प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहेत.

तर जळगाव महानगरपालिका हद्दीत आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकासह इतर पथके कार्यरत आहेत. या पथकांनी मास्क न लावणाऱ्या १ हजार २५ व्यक्तींकडून ४ लाख ८८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ८ व्यक्तींकडून ३५ हजार रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या ५ व्यक्तींकडून २ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या ८ प्रतिष्ठानांना ३५ हजार रुपये, दंड करुन ५ प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या सार्वजनिक वाहतुक करणाऱ्या ६ वाहनांवर कारवाई करुन त्यांचेकडून १० हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

शिवाय जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश दिघे यांच्यासह सर्व मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके कार्यरत असून त्यांनी मास्क न लावणाऱ्या ५ हजार ४४९ व्यक्तींकडून २२ लाख १४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ७ व्यक्तींकडून ३४ हजार ८०० रुपये, विहित मर्यादेपेक्षा जास्त संख्येने गर्दी करणाऱ्या २५ व्यक्तींकडून ३३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या १९५ प्रतिष्ठानांना ३ लाख ७६ हजार ३०० रुपये दंड करुन ५ प्रतिष्ठानांवर गुन्हे दाखल केले आहेत तर १८ प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या सार्वजनिक वाहतुक करणाऱ्या ३६८ वाहनांवर कारवाई करुन त्यांचेकडून १ लाख ४५ हजार २०० रुपयांचा दंड वसुल केल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

शेतकऱ्यांनी एचटीबीटी वाणाची लागवड न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अफगाणिस्तान संघर्ष : जाणून घ्या…तालिबानी आहेत तरी कोण? आणि त्यांचा लढा कशासाठी?

August 17, 2021

‘त्या’ संशयास्पद बोटीचा मालक कोण?, फडणवीसांनी सभागृहात दिली धक्कादायक माहिती !

August 18, 2022

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य : शिवसेना

December 30, 2020

चित्तरंजन स्वैन यांनी स्वीकारला मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक म्हणून पदभार !

November 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group