जळगाव (वासिम खान) येथील ज्येष्ठ सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व अब्दुल गफ्फार अ. रज्जाक मलिक यांना त्यांच्या जवळपास पन्नास वर्षांपासून विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत भारती विद्याभवन चेन्नई तमिलनाडु येथील एका भव्यसमारोहात आंतरराष्ट्रिय ख्याती प्राप्त ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी चेन्नई तर्फे डॉक्टरेट ही पद्वी प्रदान करण्यात आली.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रिडा व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात केलेले अतुल्य कार्य, तळागळातील लोकांच्या सेवेसाठी, समाजात एकात्मता अखंडता तसेच सलोखा निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्लोबल ह्युमन पीस विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. पी मानुअल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका भव्यसमारोहात मद्रास उच्च् न्यायालयाचे न्यायाधिश एस के क्रिशनन यांच्या हस्ते पद्वी प्रदान करण्यात आली. डॉ. अ. अब्दुल गफ्फार मलिक यांना मिळालेल्या बहुमानाबद्दल अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.