भुसावळ (प्रतिनिधी) महिलेच्या पर्समधून ताेंडाला स्कार्प बांधून आलेल्या दाेन महिलांनी ३० हजार रूपये कींमतीचे ब्रेसलेट चाेरल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी येथील बाजारपेठ पाेलिस ठाण्यात दाेन अनाेळखी महिलांविरूध्द चाेरीचा गुन्हा दाखल झाला.
रविवारी येथील आठवडे बाजार असल्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास सराफ बाजारातील माेठ्या मशीदीजवळील आयुर्वेदीक दुकानात दर्शना अभय काेठारी (रा. दिपनगर, ता. भुसावळ) ही महिला औषधी घेत असतांना त्याच्या पाठीमागून दोन महिला तोंडाला स्कार्प बांधून आल्यात. त्या काेठारी यांच्या मागे उभ्या राहून षधी घेण्याची घाई करीत हाेत्या. याच वेळी त्यांनी काेठारी याच्या पर्समध्ये हात घालून पर्समध्ये ठेवलेले साेन्याचे ७ ग्रॅम वजनाचे सुमारे ३० हजार रूपये कींमतीचे ब्रेसलेट काढून घेतले.
याप्रकरणी काेठारी यांनी बाजारपेठ पाेलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दाेन्ही अनाेळखी महिलांविरूध्द चाेरीचा गुन्हा दाखल झाला. दाेन्ही चाेरी करणाऱ्या महिला दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमाकांत पाटील हे तपास करीत आहेत.