अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील एचआयव्हीसह जगणार्या बालकांना सकस आहाराचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात बालकांना या उपक्रमामुळे मोठा आधार मिळाला आहे.
आधार संस्था अनेक वर्षापासून जिल्ह्याातील एचआयव्हीसह जगणार्या व्यक्ती समवेत विहान प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यरत आहे. तालुक्यात एचआयव्हीसह जगणारे २५ अनाथ बालके आहेत. त्यांना रोटरी क्लब व आधार संस्था यांच्याकडुन प्रोटीनचे डब्बे, बिस्किट, सॅनिटायझर, मास्क, साबण वाटप करण्यात आले. मागील चार महिन्यांपासून सुरू असलेला हा उपक्रम वर्षभर राबविण्याचा मानस रोटरीचा आहे. तर मेहराज बोहरी व समीना बोहरी यांनी आपल्या हाताने शिवलेले सुंदर फ्रॉक मुलींना भेट दिले.
या कार्यक्रमात रोटरी क्लबचे प्रेसिडेंट अभिजित भांडारकर, राजू जैन, महेश पाटील व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.एम. पाटील, ग्राहक मंचचे मेंबर महसुदभाई, अॅड. भारती अग्रवाल, आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारती पाटील, कार्यकारी संचालक रेणू प्रसाद, अश्विनी भदाणे, वैशाली शिंगाने, मनिषा पाटील, कलीम खान, तोसिफ शैख, राकेश महाजन, जयश्री ठाकरे, राहुल पाटील आदींनी सहभाग नोंदवला.