चाळीसगाव (प्रतिनिधी) सह्याद्री प्रतिष्ठानचे जुने निष्ठावंत दुर्गसेवक राज बलशेटवार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनाने सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रवर दुःखकळा कोसळली आहे. अनेक मोहिमा उपक्रम हे बलशेटवार यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकले नाही, अशा या सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकास आज चाळीसगावात सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून येथील शासकीय विश्रामगृहात पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राज बलशेटवार हे सह्याद्री प्रतिष्ठानचे जुनेजाणते निष्ठावंत दुर्गसेवक तर होतेच परंतु, त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या माहिती तंत्रज्ञान शाखेची संपूर्ण जबाबदारी ते सांभाळत असत सह्याद्री प्रतिष्ठानचा आजचा टी-शर्ट त्यावरील लोगो तयार करण्याचे काम देखील त्यांनीच केलेले आहे. अनेक मोहिमा उपक्रम हे त्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकले नाही अशा या सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकास आज सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम चव्हाण, जिल्हा प्रशासन गजानन मोरे, दत्ता भदाणे, रवींद्र सूर्यवंशी, योगेश शेळके, सचिन पाटील, दीपक राजपूत, जितेंद्र वाघ, पप्पू पाटील, राहुल पवार, मोहन भोळे, संदीप वराडे, सचिन घोरपडे, रोहित गुंजाळ, विकी राठोड, पितांबर कोळी, मनोज पाटील, चेतन चव्हाण आदी उपस्थित होते.