धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री गावाजवळील हॉटेल साई पॅलेस समोर एका अवजड वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची धक्कादायक घटना गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील साळवे गावात राहणारे पुरूषोत्तम अत्तरदे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होतो. गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जळगाव येथे कामाच्या निमित्ताने दुचाकी क्रमांक एमएच १९ आर २६७९ ने जात होते. पिंप्री गावाजवळील हॉटेल साई पॅलेस समोर एका अवजड वाहनाने पुरूषोत्तम अत्तरदे रा. साळवा यांच्या दुचाकीचा जोरदार धडक दिली. त्यात रस्त्यावर पडल्याने अवजड वाहनाने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करत मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर पोलिसांनी अवजड वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.