नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीत लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे (7 people Died in a Fire that Broke out in Delhi). दिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीत आग लागली. यात 7 जणांचा मृत्यू झाला. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
दिल्ली अग्निशमन दलानं दिलेल्या माहितीनुसार, काल (शुक्रवार) रात्री उशिरा ही घटना घडलीय. गोकुळपुरीत आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर माहिती मिळताच तात्काळ पथकं घटनास्थळी पोहोचलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाला ७ जळालेले मृतदेह सापडले. दरम्यान, दिल्ली अग्निशमन विभागानं या ७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केलीय. याबाबचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगीच्या घटनेवर दुःख व्यक्त केले असून आपण स्वतः घटनास्थळी जाऊन पीडितांची भेट घेणार असल्याचे सांगितले.