जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या परिसरात काही वेळेस बिबट्याच्या खुणा आढळल्या होत्या. या पार्श्वभूमिवर, आज विद्यापीठाचे निवासी अभियंता राजेश पाटील यांना आज सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाले आहे. यासंदर्भात वन खात्याने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राजेश पाटील हे पाच वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबासह हनुमंतखोरेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असतांना त्यांना बिबट्या दिसला. क्षणार्धात हा बिबट्या झाडीमध्ये निघून गेला. या संदर्भात अभियंता राजेश पाटील यांनी आपल्या कुटुंबाला बिबट्याचे दर्शन घडल्याची माहिती दिली. या संदर्भात आपण वन खात्याला माहिती देणार असून विद्यापीठाच्या परिसरातील बिबट्याला पकडण्याची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.