धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील स्टेट बँकेसमोर मागील भांडणाच्या कारणावरुन एकाला बेदम मारहाण करून जबर जखमी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, रोहिदास जगन भोई (वय ३३) हे आपल्या परिवारासह हनुमान नगरपरिसरात वास्तव्यास आहेत. दि. २१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेसमोर असतांना ) झुलाल जंगलु भोई, संदीप झुलाल भोई, उमेश झुलाल भोई, गणेश झुलाल भोई (सर्व रा. मोठा माळी वाडा धरणगाव) या चौघांनी शिवीगाळ करत काठयांनी व हाताबुक्यांनी पाठीवर हातावर व डोक्यावर मारुन दुखापत केली. यावेळी रोहिदास भोई यांचे डोके देखील फोडल्यामुळे त्यांच्या डोक्यातुन रक्तस्त्राव झाल्याने ते आपला जिव वाचवत ग्रामिण रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल झाले. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोहेकॉ नाना ठाकरे हे करीत आहेत.