पहूर ता.जामनेर (प्रतिनिधी) परिसरातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत दोन वेळेस अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात पिडीत अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे, त्यानुसार तू सोबत आली नाही, तर तुझी बदनामी करेल अशी धमकी देत गणेश भगवान भिल याने पिडीत मुलीचे अपहरण करुन दोन वेळा शारीरीक संबंध प्रस्थापित केलेत. तसेच बदनामी करेल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी गणेश भिल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील पोउपनिदिलीप पाटील हे करीत आहेत.