चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील रामजीपाडा येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील रामजीपाडा येथे दि १७ रोजी रात्रीच्या सुमारास १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. फिर्यादीने दि २१ रोजी अडावद पोलीस स्थानकात धाव घेत संशयित आरोपी मणिलाल रमेश बारेला (रा. पाढरी ता.चोपडा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शरीफ तडवी करीत आहेत.