एरंडोल (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरून गावाकडे दुचाकीने परतणाऱ्या एकाचा अज्ञात दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी एरंडोल ते म्हसावद रस्त्यावरील जय भद्रा पेट्रोल पंपासमोर घडली. संतोष दगडू मराठे, असे मयताचे नाव आहे.
तालुक्यांतील वरखेडी येथील रहिवासी संतोष मराठे हे वरखेडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी एरंडोल तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज होते. त्यानंतर ते आपल्या दुचाकी (एमएच १९, बीआर- ३१०६) ने घराकडे परत येत असताना समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकी (एमएच – १९, केजी – ५११६ ) ने दिलेल्या जबर धडकेत संतोष मराठे यांचा मृत्यू झाला. या बाबत एरंडोल पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष चौधरी करत आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळळ व्यक्त करण्यात येत आहे.