TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

झोपलेल्या कुटुंबियाच्या रक्षणासाठी पाळीव मांजरीची कोब्राशी झुंज

जळगावात थरार ; सर्पमित्र वेळेवर पोहचल्याने अनर्थ टळला

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पिंप्राळ्यातील कोळी कुटुंबियांच्या घरातील चार महिला जमिनीवर झोपलेल्या… तीन पुरुष पलंगावर झोपलेले… भल्या पहाटे या भरल्या घरात कोब्रा (नाग) सर्पाने प्रवेश केला. सापाच्या फुत्काराच्या आवाजाने घरातील तरुणास पहाटे तीन वाजता जाग आली आणि घरातील दृश्य पाहून त्याची पाचावर धरण बसली. एका मोठ्या कोब्रा जातीच्या सर्पाशी घरातील पाळीव मांजर झुंजत होती. तरुणाने घरातील इतर सदस्यानांही उठवले. त्यानतंर त्यांनी घराजवळच राहणाऱ्या सर्पमित्राला बोलावून घेतल्याने सर्पमित्राने सर्प पकडून मांजरासह सर्पाचेही प्राण वाचविले.

शहरातील पिंप्राळा परिसरातील प्रशांत चौक भागात राहणाऱ्या अनंत कोळी यांचे कुंटूबिय बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे झोपले होते. पहाटे घरात कोळी यांच्या मुलाला घरात फुत्कारण्याचा आवाज आला. पहिल्यांदा दुर्लक्ष केल्यानंतर पुन्हा हा आवाज वाढतच गेला. त्या आवाजाच्या दिशेने जात तरुणाने तेथे पाहिले असता, घरातील पाळीव मांजर तीन ते चार फुटाच्या कोब्राचा मार्गावर थांबून त्याच्याशी झुंजत असल्याचे दिसले. हे दृश्य पाहून त्याला धक्का बसला. त्याने तातडीने घरातील इतर कुटूंबियांना आवाज देवून जागी केले.

READ ALSO

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

यावेळी अनंत कोळी यांच्या घरातील चार महिला या जमिनीवरच झोपल्या होत्या. त्या देखील खळबळून जाग्या झाल्यात. त्यांनीही पाहीले तर जवळच पाळीव मांजरीने कोब्राचा पुढे जाणारा मार्ग अडवून ठेवला होता. कोब्राच्या फुत्कारण्याला मांजर देखील फिस्करत होती तसेच पंजा उगारुन सर्पाला रोखून धरत होती.

घरातील सदस्यांनी शेजारीच राहणाऱ्या वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र गणेश सोनवणे यांना तातडीने बोलावून घेतले. सोनवणे आपले सहकारी अजय साळवे यांना घेऊन ताबडतोब घटनास्थळी आले. सोनवणे यांनी कोब्रा सर्पाला सुरक्षित रित्या पकडले. त्यानतंर कुटुंबियांनी सुटकेचा श्वास सोडला. सकाळी सर्पमित्रांनी कोब्राला सुरक्षित अधिवासात सोडले. दरम्यान आज दिवसभर पिंप्राळ्यातील या घटनेची विशेषत: त्या पाळीव मांजरीने कोब्रा सर्पाशी केलेल्या झुंजीची जोरदार चर्चा सुरु होती.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Next Post

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १ ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरात १२ लोकं असताना मिळालं अवघ १ मत ; उमेदवार ढसाढसा रडला !

December 22, 2021

नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या

June 21, 2021

हेलिकॉप्टर अपघात : पायलटनं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला ‘तसा’ कोणताही कॉल केला नव्हता

December 10, 2021

योगेश पाटील राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित !

December 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group