TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यास व्यसनाधीनतांच्या जीवनात आशेचा किरण – माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2020
in आरोग्य, जळगाव, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) “व्यसन कोणतेही असो ते जीवाला घातक असते, व्यसनाधीन व्यक्तीची अवस्था बिकट होऊन त्याचे तो सर्वस्व हरपून बसतो. व्यसनाच्या गर्तेत गेलेल्यांना सुजाण नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आयुष्यात आशेचा ‘किरण’ कसा दिसेल, यासाठी प्रयत्नशील राहावे आणि जनजागृतीवर भर द्यावा” असे आवाहन चिंचपुरेचे मूळ रहिवासी व कवयित्री बहिणाबाईं चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. के.बी. (अण्णा) पाटील यांनी केले. पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे येथे चिंचपुरे विकास मंच आयोजित व्यसनमुक्ती शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कार्पोरेट ट्रेनर व प्रसिध्द समुपदेशक रागिब अहेमद , जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते , कलावंत तथा जेष्ठ पत्रकार तुषार वाघुळदे यांची उपस्थिती होती. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य भास्कर संतोष पाटील , व्यसनमुक्ती चळवळ राबविणारे माजी सुभेदार व विद्यापीठात कार्यरत समाधान हरी पाटील ,पोलीस पाटील भास्कर संतोष पाटील , माजी सरपंच भागवत पाटील , भगवान माधवराव पाटील , आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपुरेचे मुख्याध्यापक सुभाष देसले , जेष्ठ नागरिक उत्तम बाबुराव पाटील , माजी सैनिक रमेश कडू पाटील , सुभाष पांडुरंग पाटील , नाना सुपडू पाटील , नाना साहेबराव पाटील , विनोद पुंडलिक पाटील आदींची आवर्जून उपस्थिती होती.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

समुपदेशक रागिब अहेमद प्रबोधन करताना म्हणाले , ” व्यसनामुळे मानसिक आणि शारीरिक आजार होतात. व्यसनामुळे भ्रम हा गंभीर आजार होतो.कुठल्या न कुठल्या कारणाने व्यसन सुटतच नाही.ज्याला व्यसनांपासून पूर्णतः मुक्त व्हायचे आहे, त्याने आधी मानसिक तयारी व सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. शासनाकडून अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई होताना दिसत नाही.व्यसनाच्या नादात अनेक गुन्हे घडत आहेत.आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.कुटुंब उध्वस्त होत आहेत , ही चळवळ अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचेही प्रतिपादन करून त्यांनी अनेक उदाहरणे दिली.

“जगात ही चळवळ सामाजिक संस्था राबवितात , मात्र वेग मंदावला ” असल्याची खंत तुषार वाघुळदे यांनी व्यक्त करून ते पुढे म्हणाले,” बदलत्या जीवनशैलीमुळे पालकांना कामामुळे मुलांना वेळ देता येत नाही. पालक आणि मुलांमधील संवाद खूप कमी झालाय. अनेक शाळांमध्ये तर व्यसनी मुलांची ‘ गँग ‘ तयार झाली आहे ; ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. गुटखा, दारू, गांजा, तंबाखू, फेवीबॉड यामुळे ऐन तारुण्यात मुलांचे आयुष्य उध्वस्त होतानाचे चित्र पहावयास मिळत आहे , समाजाने जनजागृतीचा विडा उचलून त्यांना परावृत्त कसे करता येईल , यासाठी ही चळवळ तीव्रपणे राबविणे महत्त्वाचे आहे ” असेही श्री.वाघुळदे यांनी ठामपणे सांगितले. एका अनामिक मद्यपीने या शिबिरात मद्याच्या आहारी गेल्यानंतर काय काय त्रास , समस्या सहन करावा लागल्यात , व जीवनात आलेले कटू अनुभव कथन केले.

या व्यसनमुक्ती शिबिरात रागिब अहेमद यांनी काही रुग्णांचे व्यक्तीगत समुपदेशन देखील केले. तसेच त्यांनी विविध शंका – कुशंकाचे निरसन केले. शिबिरात व्यसन सोडण्याच्या विविध औषधीही व्यसनींना देण्यात आल्या.गावकऱ्यांची आता एकजूट निर्माण झाली असून गावात कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे होणार नाहीत, अशी शपथही त्यांनी मागेच घेतली आहे. याबद्दल मान्यवरांनी आनंद व्यक्त करून कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवातीला शिक्षिका रेखा पाटील यांनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांनी दीपप्रज्वलित करून शिबिराचे उदघाटन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक देसले यांनी केले. या कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

“असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात,”; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचे भाष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले अन् घडलं भयंकर ; ५ मित्रांचा तलावात बुडून मृत्यू !

July 3, 2023

जळगाव, मुक्‍ताईनगरात खडसे समर्थकांचा फटाके फोडून जल्‍लोष

June 9, 2022

जळगावात प्रथमच राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !

September 14, 2023

अभाविपच्या वतीने ७५ फुट तिरंगा पदयात्रा उत्साहात

February 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group