TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पमधील युवकांशी सुसंवाद

vijay waghmare by vijay waghmare
October 5, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) : ‘स्वतः पाहा, स्वतः विचार करा, स्वतः शिका आणि अनुभवातून पुढे जा,’ हा श्रद्धेय भवरलालजी जैन अर्थात मोठ्याभाऊंचा स्वभावच होता. एखादी गोष्ट कशी करायची, एवढ्यावर ते थांबत नसत. ती का करायची, तिच्यामागचा विचार काय आहे आणि त्याचा समाजाला काय उपयोग होणार आहे, हे समजून घेण्याची सवय त्यांनी आम्हाला लावली. असे त्यांनी सांगून युवकांसह पुढील पिढीसाठी इंटरॅक्टिव्ह, ऑडिओ-व्हिडिओचा उपयोग करून गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘गांधीतीर्थ’ ची निर्मिती केली आहे. दीपस्तंभाप्रमाणे भविष्यातदेखील गांधीतीर्थचे काम सुरू राहील, अशी ग्वाही जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली. गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पचा ३ ऑक्टोबर रोजी समारोप झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अश्विन झाला हे होते. शिबिराच्या काळात घडलेल्या गोष्टींचे एकत्रित संकलन केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करून सहभागी शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना ते अशोक जैन म्हणाले की, ‘आमचे वडील श्रद्धेय मोठेभाऊंनी आयुष्यभर केवळ एक संस्था उभी केली नाही, तर माणसं घडवली. त्यांची काम करण्याची पद्धतच त्यांची शिकवण होती. आम्हा मुलांना किंवा सहकाऱ्यांना त्यांनी कधी बसवून मोठमोठे धडे दिले नाहीत. त्यांचं स्वतःचं जगणं, काम करणं आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची त्यांची नजर वेगळी होती. ते म्हणजे ‘ओपन युनिव्हर्सिटी’ होते. ते आज प्रत्यक्षात आपल्यात नसले, तरी त्यांच्या विचारांची उपस्थिती आजही जाणवते,’ असे भावनिक विचार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘हिंदी है हम करोडो करोड…’ हे गाणे नरेंद्र वडगावकर यांनी सादर केले. आसाम राज्यातील सहभागी विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या पारंपरिक जापी टोपीने अब्दुलभाई यांच्या हस्ते अशोक जैन यांचा सत्कार करण्यात आला.
‘ती आणि मी’ या मराठीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतही रूपांतर झाले. असे उपस्थितांना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अशोक जैन यांनी या संवादात उत्तरे दिली. त्यानंतर शिबिरार्थींचे प्रातिनिधीक मनोगत व्यक्त झाले. त्यात प्रिया दुबे, शिवानी बाथम (मध्य प्रदेश), अनुराग सिंग (पश्चिम बंगाल), राकेश कुमार (बिहार), रितेश कुमार (छत्तीसगड), पैंजन गुरनुले (महाराष्ट्र) यांचा समावेश होता. दीपक मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले.

(चौकट)
गांधीतीर्थ परिसरात भारताचा दगडी नकाशा उभारणार

READ ALSO

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी उद्यानात झालेल्या गांधी जयंतीच्या कार्यक्रमात ‘भारत की संतान’ हे भारतातील विविध राज्यांच्या भाषा, वैविध्यपूर्ण, समृद्ध आणि चैतन्यमय संस्कृतीचे मनोहारी सादरीकरण झाले होते. त्यात सहभागी नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पमधील युवकांचे त्यांनी अभिनंदन केले. राज्याचे सादरीकरण होतांना नकाशातील त्या त्या राज्यांसमोर मेणबत्ती पेटविली जायची. ही संकल्पना आपल्याला खूप आवडल्याचे त्यांनी सांगितले. याच धर्तीवर भारताचा मोठा दगडी नकाशा कलात्मक पद्धतीने तयार करून गांधीतीर्थ परिसरात त्याची मांडणी करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGandhitirtha’s Work Acts Like a Beacon – Ashok Jain

Related Posts

गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दहिवद येथे स्वच्छता मोहिम संपन्न

November 6, 2020

दुर्दैवी घटना : अंतुर्ली येथे आईला वाचविताना मुलाचाही विहिरीत बुडून मृत्यू !

September 9, 2021

हिंदू नववर्षाचे संगीतमय वातावरणात संपन्न

April 2, 2022

राज ठाकरेंवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल प्रकरणी गुन्हा दाखल करावा ; धरणगाव मनसेची निवेदनाव्दारे मागणी

April 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group