जळगाव (प्रतिनिधी) शहरापासून जवळ असलेल्या आसोदा रेल्वेगेट नंतर रेल्वेरुळाखालील सांडपाणी वाहुन नेणाऱ्या मोरीत अनोळखी प्रौढाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, आसोदा शिवारात डी. सी. भोळे यांच्या शेता लगत रेल्वेरुळाच्या मोरीत एका ३० ते ४० वर्षीय आनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. आसोदा पोलीस पाटील अनंदा सिताराम बिऱ्हाडे यांनी तालूका पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावरुन तालूका पोलिस घटनास्थळी दाखल झाले, मृत्युचे नेमके कारण अद्याप उघडकीस आलेले नाही, मयत व्यक्तीच्या कबरेखाली पाया पर्यंतचा भाग भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून खाल्ल्याचा अंदाज असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवण्याचे आवाहन पेलिसांतर्फे करण्यात आले आहे. तसेच मृतदेह पोलिसांनी जिल्हारुग्णालयात दाखल केला. पुढील तपास उपनिरीक्षक कासार करीत आहेत.
















