अकोला (वृत्तसंस्था) गांधीग्राम वरुन पूर्णेचे पवित्र जल घेवून येणाऱ्या पायदळ कावडधारी शिवभक्तांना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत शिवभक्त अजय मोटवानी (वय ३५ वर्ष रा.सिंधी कॅम्प अकोट), याचा घटना स्थळावरच मृत्यू झाला तर सुरज विरवाणी हा शिवभक्त गंभीर जखमी झाला आहे.
अजय मोटवाणी हा श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी गांधिग्राम येथून कावडीने पायदळ पूर्णेचे जल आणून महादेवाला अभिषेक करायचा. श्रावण मासातील हा शेवटचा सोमवार होता. त्यानुसार तो कालही पूर्णा नदीचे जल घेवून पायदळ येत असताना त्याला पाठीमागून एका वाहनाने जोरदार धडक दिली. अजय हा अकोट येथील एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानावर करायचा. अजयला तीन भाऊ व एक बहिण असून त्याचे वडिलांचे ही निधन झालेले आहे. या अपघातातील धडक देणारे वाहन पोलिसांनी पकडले असून वाहनचालक फरार आहे.