भुसावळ (प्रतिनिधी) मक्याचे कणीस घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सुनसगाव येथील असलेल्या एका कंपनीत घडली आहे.
येथील बेलव्हाळ रस्त्यावरील सुनसगाव येथील असलेल्या कंपनीत सुरक्षा कर्मचारी म्हणून असलेले देवा पवार हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते आपल्या परिवारासह कंपनीच्या खोलीत राहतात. १८ रोजी त्यांची लहान मुलगी परी उर्फ चुटकी देवा पवार ही कंपनीत पेरलेल्या मक्याचे कणीस घेण्यासाठी गेली होती. या वेळी सर्पदंश झाल्याने तिला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना परी पवारची प्राणज्योत मालवली. ती येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत चौथीचे शिक्षण घेत होती.