भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील तरूणाला शेअर ट्रेडींगचे आमिष दाखवत तब्बल ४० लाखांची फसवणूक केल्याची प्रकरणी १४ मार्च रोजी जळगाव सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. समीम लियाकतअली मोहम्मदपूर (वय २८, रा. कटरा बाजार ता. कर्नलगंज जि. गोंडा, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर यापुर्वी फसवणूकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील राकेश पांडे यांना शेअर ट्रेण्डिंगचे आमिष दाखवून वेळोवेळी ४० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना समोर आली होती. याबाबत १४ मार्च २०२४ रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना संशयित आरोपी समीम लियाकत अली मोहम्मदपूर याची माहिती मिळाली. त्याला हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथे पोलीस कोठडीत होता. संशयित आरोपी याने फरिदाबाद येथे ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला हरीयाणा पोलीसांनी अटक केली होती. दरम्यान, जळगावच्या सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयित आरोपी समीम लियाकतअली मोहम्मदपूर (वय २८, रा. कटरा बाजार ता. कर्नलगंज जि. गोंडा, उत्तर प्रदेश) याला बुधवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथून अटक केली आहे. संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला कारागृहात रवागनी केले आहे.