धरणगाव (प्रतिनिधी) ग्रामिण भागातील मुलांना पोहण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून स्विमिंग पुल बनवण्यात यावा, अशी मागणी संजय एकनाथ माळी यांनी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात संजय एकनाथ माळी यांनी म्हटले आहे की, धरणगावात एकही स्विमिंग पुल नाहीये तसेच धरणगावातील आजुबाजूच्या शहरात स्विमिंग पुल आहेत. तरी ग्रामिण भागातील मुलांना पोहण्याची आवड निर्माण व्हावी व तसेच स्विमिंग पुल झाल्यास सर्व धरणगावातील नागरिकांना पोहण्याचा आनंद घेता येईल व धरणगावाचा सर्वागिण विकास होण्यास मदत होईल म्हणून लवकरात लवकर स्विमिंग पुल बनवण्यात यावा, असे यात म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती नरहरी झिरवळ विधानसभा अध्यक्ष, विधानसभा सचिवालय मुंबई, भगतसिंग कोश्यारी राज्यपाल महाराष्ट्र राज्य राजभवन मुंबई, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव जिल्हा मंत्रालय मुंबई, आण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक राळेगण सिध्दी ता. पारनेर जि. अहमदनगर, अभिजित राऊत जिल्हाधिकारी जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, विनय गोसावी प्रांताधिकारी एरंडोल ता. एरंडोल जि.जळगाव, नितीन देवरे तहसिलदार धरणगांव ता.धरणगाव जि. जळगाव, जनार्दन पवार मुख्याधिकारी धरणगाव नगरपालिका धरणगाव यांना पाठवल्या आहेत.