बुलडाणा (वृत्तसंस्था) जिल्ह्यात मेहकरजवळ कारला भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जण ठार, तर ७ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ही कार औरंगाबादहून शेगावला जात होती. गाडीत एकूण ९ प्रवासी होते. मेहकरजवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर गाडीचा अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान घडला. भरधाव वेगातील इर्टिगा गाडी ही रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमध्ये घुसली व तीन ते चार पलट्या मारून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये चार जण घटनास्थळीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे कळतेय.
मृतांमध्ये हौसाबाई भरत बर्वे (वय 60),श्रद्धा सुरेश बर्वे (वय 28),किरण राजेन्द्र बोरुडे ,(वय 35),भाग्यश्री किरन बोरुडे (वय 28),प्रमिला राजेन्द्र बोरुडे (वय 58 ),जानवी सुरेश बरवे (वय 12 वर्ष) यांचा यांचा समावेश आहे. तर अपघातग्रस्त ईर्टीगाचा क्रमांक एम एच 20 – 8962 आहे. कारचे मालक हे सुरेश बर्वे हे असल्याची माहिती आहे. ते एन-11 द्वारकानगरचे रहिवासी असून एमएसईबीचा कर्मचारी आहे. ते त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी समृद्धी महामार्गावरून जात होते.