अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रणाईचे येथील शेतकरी कापसाने भरलेले ट्रॅक्टर पारोळा येथील जिनिंग मध्ये खाली करण्यासाठी घेऊन जात असतांना पैलाड भागातील संभाजी नगरातील खड्डयात चाक पडल्याने ट्रॅक्टर उलटले.
यावेळी बाजुने चालणारा दुचाकीस्वार नशीब बलवत्तर म्हणून बालंबाल बचावला. पैलाड भागात रस्त्याची कामे चालू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते.