पाचोरा प्रतिनिधी -: तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई करणाऱ्या तहसील प्रशासनाच्या पथकावर १३ -. जानेवारीला रात्री ११ वाजेच्या सुमारास वाळू माफियांनी हल्ला र केल्याची धक्कादायक घटना व घडली. वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने न शासकीय वाहनास जबर धडक व देऊन पथकातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
पाचोरा तहसीलदारांनी अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक १३ जानेवारीला रात्री तालुक्यात गस्त घालत असताना, त्यांना अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर दिसला. पथकाने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ट्रॅक्टर चालकाने पथकाच्या शासकीय वाहनाला जाणीवपूर्वक आणि वेगाने धडक दिली. या भीषण धडकेत शासकीय वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, पथकातील कर्मचारी थोडक्यात बचावले आहेत. या पथकात पथक प्रमुख सचिन मोरे, राजेंद्र शिरसाट, अतुल पाटील,ततेराव सपकाळ, सागर मोरे यांचा समावेश होता. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे थेट हल्ला झाल्यामुळे महसूल विभागात संतापाची लाट उसळली आहे. वाळू माफिकांचे धाडस इतके वाढले आहे की, त्यांनी आता थेट प्रशासकीय पथकालाच लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हल्लेखोर ट्रॅक्टर चालकाचा शोध घेतला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
















