भुसावळ (प्रतिनिधी) नवी मुंबईतील मूळ रहिवासी असलेल्या मात्र बसस्थानक परीसरात भीक मागून उदरनिर्वह करणार्या वयोवृद्ध महिलेचा शनिवारी भुसावळ बसस्थानकाजवळ मृत्यू झाला. लताबाई अशोक कवाडे (65, नवीमुंबई, ह.मु.बसस्थानकाजवळ, रेल्वे ग्राऊंड, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
बसस्थानकासमोरील रेल्वे पटांगणावर कवाडे या भीक मागून उदरनिर्वाह करीत होते मात्र शनिवारी त्यांचा झोपलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर ट्रामा सेंटरला त्याां दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.