धरणगाव (प्रतिनिधी) पाळधी गावातील हॉटेल सुगोकीजवळ भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घटना शुक्रवारी ५ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली होती. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. दत्तू प्रकाश पाटील वय ३४ रा. फुलपाट ता. धरणगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील फुलपाट गावात दत्तू पाटील हा तरूण आईवडील, पत्नी, भाऊ आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. टाकरखेडा येथील एका कंपनीत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम पाहत होता. दैनंदिनीप्रमाणे शुक्रवारी ५ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास दत्तू पाटील हा दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीटी १०१५) ने कंपनीतून घरी फुलपाट येथे जाण्यासाठी निघाला. त्यावेळी पाळधी गावातील सुगोकी हॉटेलसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत दत्तू पाटील हा गंभीर जखमी झाला. त्याला जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी ८ जुलै रोजी रात्री ११ वाजता प्राणज्योत मालविली. या घटनेमुळे कुटुंबाने मोठा अक्रोश केला. या घटनेबाबत पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू होते. मंगळवारी ९ जुलै रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.