धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रसिद्ध श्री इलेक्ट्रिकर्स आणि प्लंबिंगच्या गणेशाची आरती पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली.
पोलिस निरीक्षक खताळ यांनी शहरातील प्रसिद्ध श्री इलेक्ट्रिकर्स आणि प्लंबिंग या दुकानाला भेट दिली. यावेळी त्यांनी गणेशाची आरती केली. यावेळी सपोनि जिभाऊ पाटील, सपोनि संतोष पावर, गोपनीयचे विनोद संदानशिव यांच्यासह परिसरातील दुकानदार आणि मित्र परिवार उपस्थित होते. दुकानाचे संचालक अविनाश चौधरी यांनी सर्वांचे स्वागत केले.