जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी आज पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष स्व. डॉ.अब्दुल गफ्फार मालिक यांचे चिरंजीव एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांनी अब्दुल गफ्फार मालिक फाउंडेशनतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रुपये ३१ हजारांचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी जळगाव जि. निरीक्षक अविनाश जी आदिक, आमदार अनिल भाईदास पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मंत्री गुलाबराव देवकर, जि.अध्यक्ष रविन्द्र भैय्या पाटील, आमदार संतोष भाऊ चौधरी, आमदार दिलीप वाघ, आमदार मनीष जैन, आमदार दिलीप तात्या सोनावणे, आ. जगदीश वलवी, अँड. रोहिणी ताई खडसे, महिला जि.अध्यक्ष वंदना ताई चौधरी, महिला महानगर अध्यक्षा मंगला ताई पाटील, संजय पवार, संजय दादा गरुड़, उन्मेष पाटील, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, नामदेवराव चौधरी, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, योगेश देसले, अशोक लाड़वंजारी, विनोद देशमुख, स्वप्निल नेमाड़े, रविंद्र नाना पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.