जळगाव (प्रतिनिधी) चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार फरदीन उर्फ साहील गोल्डन जमीलोद्दीन शेख (रा. गणेशवाडी, जामनेर) याच्या भुसावळातील जाममोहल्ला परिसरातून एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या.
जामनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील फरदीन उर्फ साहील गोल्डन जमीलोद्दीन शेख हा भुसावळातील जाममोहल्ल्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी पोहेकॉ किशोर राठोड, पोना रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, सचिन महाजन यांचे पथक रवाना केले. या पथकाने सापळा रचून दि. २५ रोजी फरदीन याच्या मुसक्या आवळल्या. पुढील कार्यवाहीसाठी त्याला जामनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
















