अकोला (वृत्तसंस्था) एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला समोसा- कचोरी देण्याची भूलथाप देऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे.
अकोला शहरातील केशवनगर येथील रहिवासी असलेला आरोपी सचिन प्रल्हाद धोत्रे (४०) याने पीडित १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला समोसा- कचोरी खाण्याच्या बहाण्याने एमआयडीसीतील शेत शिवारामध्ये नेऊन अत्याचार केला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी खदान पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन आरोपीविरुद्ध तक्रार दिली.
या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी आरोपी सचिन धोत्रे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३७७ सह कलम ४, ८, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. खदान पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अवघ्या एका तासात अटक केली आहे.