धरणगाव (प्रतिनिधी) १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सन २०२३ चे दिवाळी सनानंतर ४ ते ५ दिवसांनी ते जानेवारी २०२४ चे दरम्यान प्रविण बारेला याने त्यांच्या १४ वर्षीय मुलीला चॉकलेटची गोळी सारखी काहीतरी गोळी देवुन बळजबरीने शरिर संबध केले. तसेच सदर बाब कोणाला सांगीतली तर तुझ्या आईवडीलांना जिवे ठार मारुन टाकेल, अशी धमकी देखील दिली. तर प्रविण हा पिडीत मुलीसोबत सोबत शरिरसंबध करीत असल्याचे बघितल्यानंतर पिडीतेला एकातांत भेटुन घटनेची बदनामी करण्याची धमकी देऊन पन्नालाल मराठे याने देखील बळजबरीने पिडीत मुलीसोबत शरिर संबध करुन बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे हे करीत आहेत.