TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत माहिती अधिकार कायदा दिनानिमित्त व्याख्यान व चर्चासत्र !

माहिती अधिकार हे नागरिकांना मिळालेले एक प्रभावी शस्त्र : राजेंद्र वाघ !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधत व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करून “माहिती अधिकार कायदा दिन २८ सप्टेंबर” उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माहिती अधिकार दिन अंतर्गत डी.बी वाघ सर यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले व माहिती अधिकार कायदा सर्वांसाठी हिताचा आहे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य एम ए मराठे होते. कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून माहिती अधिकार कायदा महासंघाचे विभागीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ यांसह आरटीआय धरणगाव तालुकाध्यक्ष प्रा.सतिष शिंदे होते. प्रमुख अतिथी भरत शिंपी होते. कार्यक्रमाच्या तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

READ ALSO

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

आरटीआयचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार सतिष शिंदे यांनी माहिती अधिकाराबाबत सांगितले की, २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन का म्हणून साजरा करण्यात येतो. नागरिकांना शासन दरबारी नेमके काय चाललंय, हे समजून घेण्याचा माहितीचा अधिकार सर्वांना मिळालेला आहे. माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व सकल जनांना पटावे म्हणून आपल्या सर्वांसाठी हा कायदा आहे. माहिती अधिकार हे नागरिकांच्या हाती मिळालेले एक प्रभावी शस्त्र आहे त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला नवीन पिढीला तो माहित नाही. दुर्दैवाने माहितीच्या अधिकाराबाबत पाहिजे तेवढी जनजागृती अजूनही झालेली नाही. म्हणून प्रत्येकांनी माहिती अधिकार कायदा समजून घेतल्याने लोकशाही बळकट होण्यास मदत होईल असेही श्री. शिंदे यांनी मनोगतातून सांगितले.

तद्नंतर मा.अधि.कायदा महासंघाचे विभागीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी सांगितले की, एकविसाव्या शतकात माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जनतेला प्रशासकीय कारभाराची माहिती सहजगत्या मिळणे अत्यंत आवश्यक आहे. माहिती मिळविणे हा तुमचा-आमचा, सर्वांचा मुलभूत हक्क व अधिकार असून, “समवृध्द लोकशाहीचा तो पाया आहे.” म्हणनूच शासकीय कारभारात, प्रशासन यंत्रणेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि खुलेपणा असणे आवश्यक आहे. जनतेच्या मुलभूत अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आणि हा अधिकार त्यांना परिणामकारकरित्या वापरता यावा म्हणून महाराष्ट्र राज्याने, माहिती अधिकाराचा अध्यादेश व त्या खालील नियम, राज्यभर २३ सप्टें, २००२ पासून लागू केला होता. केंद्र शासनाने १५ जून २००५ रोजी माहितीचा अधिकार कायदा लागू केला आणि हा कायदा महाराष्ट्र राज्याने १२ ऑक्टो,२००५ ला लागू झाला. सदर मा.अ.कायदा सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी आहे. प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा, त्याचप्रमाणे अनेक प्रकरणांमध्ये प्रशासकीय त्रुटीमध्ये माहितीच्या अधिकार आहे. तसेच, कायद्यातील तरतुदीनुसार माहिती मिळविण्याची इच्छा असलेल्या नागरिकास साध्या कागदावर दहा रुपयांचे तिकीट चिकटवून अर्ज करता येतो. तसेच, माहिती अधिकार कायद्याचा कुणी दुरुपयोग करत असेल, तर त्याबाबत तक्रार करावी. असेही आवाहन राजेंद्र वाघ यांनी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना आपल्या प्रबोधनात्मक मनोगतातून माहिती अधिकाराबाबत माहिती देत नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले.

शेवटी अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य एम ए मराठे यांनी सांगितले की, आमच्या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करून जागृतीसाठी वक्तृत्व, निबंध, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चर्चासत्र यासह समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो. त्याचप्रमाणे माहिती अधिकाराच्या वापर, कार्यालयीन कामकाजाविषयी पारदर्शकता कशी निर्माण करता येईल, व माहिती अधिकाराचा वापर घटनात्मक पद्धतीने करून समाज पद्धतीने करून जनजागृती करण्याबाबत प्राचार्य मराठे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सांगितले. याकरिता माहिती अधिकार कायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा, याच हेतूने शहर व परिसरातील आरटीआय चे पदाधिकारी जितेंद्र महाजन, प्रा.दिपक पाटील, अवधेश बाचपाई, मेजर ज्ञानेश्वर मराठे, भरत शिंपी, प्रभाकर ठाकूर, पी डी पाटील, विकास पाटील, निलेश पवार, लूनेश्वर भालेराव हे माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निरंतर प्रयत्नात असतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एन परदेशी यांनी तर आभार एस डी मेढे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी आर नेरकर, एन आर कापडी मॅम, शुभांगी पाटील मॅम, जगदीश पाटील, भूषण रानवे, शिपाई लोकेश चावरे, एस आर चव्हाण, मेस्कोचे सतिष पाटील, शांताराम जाधव आदींसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026 !

September 23, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
Next Post

रात्री गॅसचे बटन सुरूच राहिले, पहाटे भीषण स्फोट ; तीन जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता

January 21, 2021

TET पेपरफुटी प्रकरण : आयुक्त सुपेंच्या घरी आणखी सापडली २ कोटीची रोकड आणि सोनं !

December 20, 2021

खेळाडूवृत्ती प्रत्येकाने जोपासावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

July 12, 2025

जीवे मारण्याच्या धमकीनंतर गुलाबराव वाघ यांना पोलिस सुरक्षा !

July 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group